अचानक बसचे फुटले चाक ... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:17 PM2018-12-21T23:17:07+5:302018-12-21T23:18:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील दत्तमंदिरजवळ अचानक बसचे समोरचे टायर फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. बस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील दत्तमंदिरजवळ अचानक बसचे समोरचे टायर फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. बस चालकाने बसवरील ताबा सुटू न दिल्याने पुढील अनर्थ टळला.
दत्त मंदिराजवळ उताराच्या रस्त्यावर अचानक बसचा समोरचा टायर फुटल्याने बस ताबडतोब चालकाने थांबवली. अकोल्यावरून निलंग्याकडे जाणारी बस बळसोंड भागातील दत्त मंदिर येथे चालू असताना अचानक समोरचे चाक फुटल्याने काही अंतरावर जाताच चालकाने त्या बसवर ताबा मिळवला. अन् बसमधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. बसमध्ये एकूण २५ प्रवाशी होते.
या प्रवाशांना नंतर हिंगोली येथील बसस्थानकात नेऊन सोडण्यात आले. आगारात तत्काळ बस दुरूस्त केली. यावेळी चालक सुरेश पेडे, वाहक मलशेटे व अनिल पाटील यांनी बसमधील बिघाडाची दुरूस्ती केल्यानंतर पुढे रवाना झाले.
दोन ट्रकची समोरासमोर धडक; सहा तास वाहतूक ठप्प
कळमनुरी : येथील हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर सातव महाविद्यालयाजवळ २१ डिसेंबर रोजी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने वाहतूक तब्बल साडेसहा तास जवळपास वाहतूक विस्कळीत झाली होती. २१ डिसेंबर रोजी रात्री साडेतीनच्या सुमारास हिंगोलीहून नांदेडकडे जाणाऱ्या एचआर- ५८ बी- ७३२४ व नांदेडहून हिंगोलीकडे जाणाºया एमएच-२० बीई-८१७७ या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच सकाळी ४ वाजता पोनि जी.एस. राहिरे, फौजदार शिवसांब घेवारे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. एका ट्रकचा रॉड तुटला होता. तर दुसºया ट्रकचे समोरचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. पोलिसांनी ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. एक ट्रक दुपारपर्यंत रस्त्यावरच असल्याने वाहतुकीचा खोळंबा सुरूच होता. वाहतूक सुरळीतसाठी शिवाजी घोंगरे, सातव, गणेश सूर्यवंशी, शिवाजी दिमगुंडे, जमादार खरात आदींनी परिश्रम घेतले.