आत्महत्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:31 PM2018-01-07T23:31:15+5:302018-01-07T23:31:22+5:30
तालुक्यातील कलगाव शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेवून दिलीप पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी आरोपींच्या त्रासालाच कंटाळुन दिलीप पवार यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद किसन पवार यांनी दिली. त्यावरून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने ११ जणांवर हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील कलगाव शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेवून दिलीप पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी आरोपींच्या त्रासालाच कंटाळुन दिलीप पवार यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद किसन पवार यांनी दिली. त्यावरून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने ११ जणांवर हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतातील तूर नेल्याने बासंबा ठाण्यात गुन्हा दाखल असून तूझ्या आई-वडिलांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचे आहे, असे म्हणत विविध कारणांवरून आरोपींनी दिलीप पवार यास मानसिक त्रास दिला. त्यामुळेच दिलीप पवार यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटेले आहे. किसन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ इंगोले, दिक्षाबाई इंगोले, दिलीप इंगोले, मुकिंदा इंगोले, राहुल इंगोले, प्रकाश इंगोले, कचरू इंगोले, भाऊराव इंगोले, संजू राठोड, वसूराम चव्हाण, सम्राट कांबळे एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल झाला. तपास उपविपोअ सिद्धेश्वर भोरे करीत आहेत.