हिंगोलीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:21 AM2018-07-16T00:21:32+5:302018-07-16T00:21:49+5:30
शहरातील जिजामातानगर येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जिजामातानगर येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मयत युवकाचे नाव सचिन प्रभाकर कीर्तनकार (३२) आहे. घरातील झोक्याच्या दोरखंडाने सचिन किर्तनकार यांनी १४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेतला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
सदर घटना रविवारी उघडकीस आली. दारूच्या नशेत सचिन कीर्तनकार यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिजामातानगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच हिंगोली शहर ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी तात्काळ हजर झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.