युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:31 AM2019-02-11T00:31:07+5:302019-02-11T00:31:22+5:30
वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत शिवाजी हारबळे (२२) यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत शिवाजी हारबळे (२२) यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत हारबळे यांच्या डोक्यावर ताण-तणावामुळे मागील काही दिवसांपासून परिणाम झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मानसिक तणावातून भागवत हारबळे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी भुजंग हारबळे यांनी दिलेल्या माहितीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जमादार वाळके हे करीत आहेत. मयत भागवत हारबळे यांचे वडील शिवाजी हारबळे यांच्यावर बँकेचे कर्ज होते. त्यामुळेही भागवत हारबळे हे नेहमीच चिंतेत असायचे. परंतु रविवारी भागवत हारबळे यांनी दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली.