ओमप्रकाश देवडा बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:59 PM2017-12-05T23:59:24+5:302017-12-06T00:00:08+5:30
येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा यांची दुस-यांदा निवड झाली आहे. तर रुपचंद बज हे तिस-यांदा उपाध्यक्ष झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा यांची दुस-यांदा निवड झाली आहे. तर रुपचंद बज हे तिस-यांदा उपाध्यक्ष झाले आहेत.
या बँकेच्या २0१७-२0२२ या कालावधीसाठीच्या संचालक व पदाधिकाºयांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून राष्ट्रीय सहकारी संघ दिल्लीचे डॉ.भगवतीप्रसाद हे होते. संचालक मंडळात आशिष काबरा, रामप्रकाश देवडा, प्रकाशचंद सोनी, राजेश अग्रवाल, शशिकांत दोडल, राजू मुदिराज, डॉ.हंसा बगडिया, विठ्ठलदास मुंदडा, ज्ञानेश्वर मामडे, गजानन देशमुख, राजेंद्र निमोदिया, विजय अग्रवाल, जुगलकिशोर धन्नावत, नरेंद्र मोदी, सुभद्रा मंत्री, नरेंद्र अग्रवाल, प्रकाश गोयल, बजरंगलाल अग्रवाल यांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सुनील देवडा यांनी स्व. ओमप्रकाश देवडा यांच्या योगदानाची जाणीव ठेवून प्रत्येक घटकाला सोबत घेवून काम करू, अशी ग्वाही देत असल्याचे सांगितले.