जातिवाचक शिवीगाळ; ११ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:00 AM2018-04-16T01:00:37+5:302018-04-16T01:00:37+5:30
घरासमोर पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : घरासमोर पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिद्धार्थनगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सिद्धार्थनगर येथील राजकुमार जगदीश जावळे यांच्या घरात दिलीप गव्हाणे हे अनधिकृतरीत्या प्रवेश करत पताके व झेंडे लावून फटाके का फोडले, या कारणावरून वाद घालत तलवारीने मारहाण केली व जातिवाचक शिवीगाळ केली. यावेळी एका महिलेने विरोध केला असता त्यांचा विनयभंग करून बाळू गव्हाणे याने दगडाने मारहाण केली. व इतर ९ जणांनी विटा व दगडांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जावळे यांच्या फिर्यादीवरून दिलीप गव्हाणे, बाळू गव्हाणे, विजय शिंदे, सरस्वती गव्हाणे, अभिषेक गव्हाणे, योगेश सुरवसे, जिजाबाई गव्हाणे व इतर चौघांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपविभागीय पो. अ. राहुल मदने, पोनि भंडरवार यांनी भेट दिली.