पोलीस अधीक्षकांनी सात जणांना केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:33 AM2021-08-28T04:33:10+5:302021-08-28T04:33:10+5:30
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. ए. सुडके यांनी करण जिलाण्या पवार, संजय ऊर्फ काल्या पंडिता काळे ...
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. ए. सुडके यांनी करण जिलाण्या पवार, संजय ऊर्फ काल्या पंडिता काळे (दोघे रा. लिंबाळा मक्ता), फिरोज खॉ रशीद खॉ पठाण (रा. सेलू बाजार जि. वाशिम), प्रकाश ऊर्फ बंडू हरिभाऊ गायकवाड (रा. सावंगा जहागीर जि. वाशिम) या ४ जणांना तसेच सेनगावचे तत्कालीन पोनि सरदारसिंग ठाकूर यांनीही चंद्रभान गणपत कायंदे ऊर्फ कांदे (रा. साखरा ह.मु. सावंगी येलदरी ता. जिंतूर), सुरेश नामदेव कायंदे ऊर्फ कांदे (रा. साखरा ह.मु. आगरवाडी ता. रिसोड), परमेश्वर नारायण वावरे (रा. साखरा ह.मु. निजामपूर रिसोड) यांना दोन वर्षाॅसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दोन्ही प्रस्तावातील ७ जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केल्याचे आदेश काढले आहेत. तसेच हे आदेश सातही आरोपींना बजावून तत्काळ जिल्हा हद्दीतून काढून देण्यासंदर्भात हिंगोली ग्रामीण व सेनगाव पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ही कार्यवाही करण्यास स्थागुशाचे पोनि. उदय खंडेराय, पोहेकॉ विलास सोनवणे, पोना राजूसिंग ठाकूर यांनी मदत केली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी यापूर्वीही विविध पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे करणाऱ्या २० जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले होते. टोळीने गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व ठाणेदारांना दिल्याची माहिती कलासागर यांनी दिली.