अंधश्रध्दा ‘विकास’ विरोधी असतात- बावगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:23 AM2017-12-24T00:23:13+5:302017-12-24T00:23:13+5:30
अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अंधश्रद्धा विकास विरोधी असतात, अंधश्रद्धेमुळेच देशाचा विकास खुंटतो त्यामुळे प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टिकोण स्विकारावा अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी २३ डिसेंबर रोजी व्याख्यानात दिली.
महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिंगोली शाखेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हॉल येथे बावगे यांचे व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाजी पाईकराव होते. यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, खंडेराव सरनाईक, अशोक अर्धापुरकर, दिवाकर माने, अशोक एंगडे, सम्राट हाटकर, कºहाळे, प्रकाश इंगोले, गजानन कुटे, अॅड. साहेबराव सिरसाट, रावण धाबे, प्रशांत बोडखे, रमेश इंगोले आदी उपस्थित होते. समितीच्या संघटनात्मक दौºयानिमित्त माधव बावगे हिंगोली येथे आले होते. पुढे बोलताना बावगे म्हणाले नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश खुनाची मालीका सुरूच आहे. मात्र आरोपींना अटक केली जात नाही हे संशयास्पद आहे. दाभोळकरांचा खुन करणारे भित्रे आहेत. त्यांनी पाठीमागुन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. परंतु मारेकºयांचा भ्रमनिराश झाला, कारण दाभोळकरांच्या मृत्यूनंतरही संघटनेचा अंधश्रध्दा निर्मुलनचा लढा अखंड चालू आहे. संघटनेमार्फत राज्यभरात एकोपा निर्माण करून सामाजिक चळवळ उभी केली जात आहे. संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी निर्भयपणे काम करीत असून वैज्ञानाची बिजे रोवत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
विज्ञानाच्या प्रयोगाने नागरिक थक्क
माधव बावगे यांनी कार्यक्रमात विविध प्रयोग करून दाखवत, बुवा-बाबा कशाप्रकारे चमत्कार करतात व फसवितात, त्याचे प्रात्येक्षिक दाखविले. विज्ञानाच्या चमत्काराने मात्र कार्यक्रमातील नागरिक थक्क झाले होते. त्यानंतर बावगे यांनी विज्ञानाच्या मदतीने कसे प्रयोग करतात हे समजावून सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना बावगे म्हणाले माणसातल्या मनातील भीती दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याचे काम अंनिसतर्फे केले जात आहे. यामध्ये सर्वांनी एकोप्याने सहभागी होऊन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.