आजपासून पुरवणी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:00 AM2018-07-17T01:00:46+5:302018-07-17T01:00:59+5:30
जिल्ह्यात १७ जुलैपासून होणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची तयारी शिक्षण विभागाकडून पूर्ण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात १७ जुलैपासून होणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची तयारी शिक्षण विभागाकडून पूर्ण करण्यात आली. यासाठी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीस शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दहावीची परीक्षा २0४६ विद्यार्थी देणार असून यासाठी सात परीक्षा केंद्र आहेत. यात हिंगोलीत जि.प. बहुविध प्रशाला, सरजूदेवी कन्या विद्यालय, वसमतला म.गांधी विद्यालय, कळमनुरीत म.फुले विद्यालय, जि.प. प्रशाला, औंढ्यात जि.प. प्रशाला तर सेनगावातही जि.प. प्रशालेत परीक्षा केंद्र आहे.
बारावीसाठी ८0३ विद्यार्थी असून जिल्ह्यात केवळ दोनच परीक्षा केंद्र आहेत. यात वसमतला बहिर्जी स्मारक महाविद्यालय व हिंगोलीत आदर्श महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व ९ परीक्षा केंद्रांवर १३५ पर्यवेक्षक लागणार आहेत. सर्व केंद्र संचालक व कर्मचाºयांच्या नियुक्त्या करून त्यांना विविध सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. दहावीची परीक्षा १७ जुलै ते ४ आॅगस्ट तर बारावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या काळात होणार आहे.