पोरक्या प्रांजलला मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:51 PM2017-12-11T23:51:56+5:302017-12-11T23:52:17+5:30
सांगली येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचा शिक्षण व लग्नापर्यंतचा खर्च पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी उचलला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सांगली येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचा शिक्षण व लग्नापर्यंतचा खर्च पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी उचलला आहे. माणसाने माणुसकीने वागणे हिच माणुसकी आहे, असे म्हणत त्यांनी स्त्री सुरक्षिततेबाबत ‘लोकमत’शी बोलताना खंतही व्यक्त केली.
लुटमारीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या अनिकेत कोथळे यांना सांगलीचे पोउपनि युवराज कामटे व अन्य पोलीस कर्मचा-यांनी कोठडीत असताना बेदम मारहाण केली. त्यामुळे अनिकेतचा जीव गेला. खाकी वर्दीतील माणुसकी पुसून टाकणाºया अधिकारी व कर्मचा-यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले. परंतु अनिकेतच्या मृत्यूमुळे प्रांजल मात्र पोरकी झाली. अनिकेत कोथळेच्या प्रकरणाने मात्र पोलिसांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोणच बदलला आहे. परंतु खाकी वर्दीतील माणुसकी आजही जीवंत असल्याचे उदारहण सुजाता पाटील यांच्यामुळे घडून आले आहे. त्यांनी प्रांजलला दत्तक घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला. प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे, असा संदेश सुजाता पाटील यांनी दिला.