जिल्हाधिका-यांनी रात्रीला केली वाळूघाट पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:48 PM2018-01-13T22:48:59+5:302018-01-13T22:51:42+5:30
सेनगाव तालुक्यातील सालेगाव परिसरात केफूचे वाळूसाठे करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रात्रीच्या वेळी या भागात पाहणी केली. काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली असली तरीही साठे मात्र आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सालेगाव परिसरात केफूचे वाळूसाठे करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रात्रीच्या वेळी या भागात पाहणी केली. काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली असली तरीही साठे मात्र आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
या भागात केफूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत महसूलच्या पथकानेही अनेकदा कारवाई केली. मात्र तस्करांकडून रात्रीच्या वेळी अवैध केफूसाठा करून त्याची विक्री केली जात असल्याचे काही जणांनी जिल्हाधिकारी भंडारी यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले होते. त्यामुळे भंडारी यांनी प्रत्यक्ष या भागात पाहणीचा दौरा केला. मात्र सालेगाव येथील पोलीस पाटलांना पाचारण केले असता ते आजार असल्याने घटनास्थळी येवू शकले नाही. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आदींनी या भागात त्यांच्यासमवेत पाहणी केली.
या पाहणीनंतर जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ही तस्करी रोखण्यासाठी नदीपर्यंत जाणारा अवैध रस्ताच नष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच उपलब्ध साठ्याचा पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगितले. हा प्रकार यापुढे आढळल्यास या सर्व संबंधितांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.