घरकुल अर्जांचे सर्वेक्षण शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:28 AM2018-12-12T00:28:34+5:302018-12-12T00:29:34+5:30
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील १ लाख १८ हजार अर्जांपैकी १८ हजार ४८४ अर्ज अजूनही पडताळणीचे शिल्लक आहेत. मागील तीन वर्षांपासून प्रपत्र ‘ड’ मधील लाभार्थ्यांच्या नावाचा गोंधळ सुरूच आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील १ लाख १८ हजार अर्जांपैकी १८ हजार ४८४ अर्ज अजूनही पडताळणीचे शिल्लक आहेत. मागील तीन वर्षांपासून प्रपत्र ‘ड’ मधील लाभार्थ्यांच्या नावाचा गोंधळ सुरूच आहे
हिंगोली जिल्ह्यासह राज्यात प्रधानमंत्री आवास या योजनेतील निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना यादीत स्थान मिळाले नसल्याची ओरड होती. अशा लाभार्थ्यांना प्रपत्र ड मधून अर्ज भरून घरकुल लाभाच्या यादीत येण्याची संधी होती. मात्र अशा अर्ज भरून घेतल्यानंतर प्रशासनाने वार्ताहर मिळतात त्यावर पुढील कोणतीच कारवाई जाधव कॉपीकेली नव्हती. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पडून होते. याबाबत तक्रारींचा सूर उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने या याद्यांचे चावडी वाचन करून अजून काही लाभार्थी शिल्लक तर राहिले नाहीत? याचा अंदाज घेतला. मागील काही दिवसांपासून या याद्या आॅनलाईन करण्याचे काम सुरू आहे. १५ आॅगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत आलेल्या वाढीव अर्ज मिळून एकूण १ लाख १८ हजार अर्ज समोर आले होते. यामध्ये औंढा तालुक्यात २५ हजार ९३६, वसमत तालुक्यात सतरा हजार ५८, हिंगोली तालुक्यात २६ हजार ४५२, कळमनुरी तालुक्यात २५ हजार ५३२, सेनगाव तालुक्यात २३ हजार ३३० अर्ज सर्वेक्षणानंतर प्राप्त झाले होते. यापैकी आधार क्रमांक असलेले ३९ हजार अर्ज होते. ते आॅनलाइन केले आहेत.तर ८ हजार ८५० अर्ज पडताळणी पूर्ण झालेले आहेत. २ हजार ४८ अर्ज फेटाळले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात १८ हजार ४०० अर्जांचे सर्वेक्षणच अजून शिल्लक आहे. यामध्ये औंढा तालुक्यात एक हजार २०७, वसमत मध्ये ३ हजार ६६२, हिंगोलीत ५ हजार ६१४, कळमनुरीत १ हजार ७८३ तर सेनगाव मध्ये ६ हजार २१८ लाभार्थी सर्वेक्षणाचे शिल्लक आहेत.