महिलेची पोत चोरणारा निघाला निलंबित तलाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:33 PM2018-05-09T19:33:27+5:302018-05-09T19:33:27+5:30
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. सुभाष बोथीकर असे चोरट्याचे नवा सून तो निलंबित तलाठी आहे.
हिंगोली : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. सुभाष बोथीकर असे चोरट्याचे नवा सून तो निलंबित तलाठी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील प्रिती प्रवीण शिंदे उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. आज पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास सुभाष बापुराव बोथीकर (डुकरे) याने उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील अंदाजे बारा हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावली व त्याने तेथून पळ काढला. यावेळी महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. जिल्हा रूग्णालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही वेळीच पाठलाग केला तसेच सदर माहिती हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ यांना दिली. मैराळ यांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. यानंतर पोलिसांनी बोथीकरला जेरबंद केले.
याप्रकरणी प्रिती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटा निघाला, लाच प्रकरणातील आरोपी
आरोपी सुभाष बोथीकर हा पांगरा शिंदे येथे गतवर्षी तलाठी म्हणून कार्यरत होता. त्याला एसीबीच्या पथकाने एका प्रकरणात लाच घेताना पकडले होते. यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापुरकर यांनी दिली.