दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 04:37 PM2018-10-20T16:37:22+5:302018-10-20T16:43:44+5:30

आज सकाळी ११ वाजेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. 

Swabhimani Rastaroko demanded to declare drought | दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा रास्तारोको

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा रास्तारोको

Next

डोंगरकडा (हिंगोली) : संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे यांच्या नेतृत्वात  नांदेड ते हिंगोली रस्त्यावरील डोंगरकडा येथे रास्तारोको आंदोलन केले. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा कराव्या, वीजबिल माफ करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी, पीकविमा मंजूर करावा, शेतीसाठी सलग दहा तास वीजपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पी.एन.ऋषी, पोनि व्यंकटेश केंद्रे यांच्याकडे देण्यात आले.  

यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, तालुकाध्यक्ष पराग अडकिणे, बेगाजीराव गावंडे, डिगांबर गावंडे, पप्पू अडकिणे, चंद्रशेखर कुलकर्णी, पंडित ऐगाडे, पंकज अडकिणे, किशन गावंडे, लक्ष्मण अडकिणे, उद्धव गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आखाडा बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सपोनि ओमकांत चिंचोलकर, जमादार भगवान वडकिल्ले, शेख बाबर, बापूराव बाभळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

 

Web Title: Swabhimani Rastaroko demanded to declare drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.