मीठाची यात्रा पंचकोशीत प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:50 AM2018-03-04T00:50:04+5:302018-03-04T00:50:13+5:30
हिंगोली तालुक्यातील नर्सी हे ठिकाण राष्टÑीय संत श्री नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ तसेच या ठिकाणी संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असल्याने हे ठिकाणी तिर्थक्षेत्र म्हणून सर्वदुर परिचित आहे. येथे दरवर्षी पापमोचनी एकादशीला यात्रा भरते ही यात्रा मीठाची यात्रा म्हणूनही पंचकोशीत प्रसिद्ध आहे.
बापूराव इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी हे ठिकाण राष्टÑीय संत श्री नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ तसेच या ठिकाणी संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असल्याने हे ठिकाणी तिर्थक्षेत्र म्हणून सर्वदुर परिचित आहे. येथे दरवर्षी पापमोचनी एकादशीला यात्रा भरते ही यात्रा मीठाची यात्रा म्हणूनही पंचकोशीत प्रसिद्ध आहे.
१३ मार्च पासून पापमोचनी एकादशीला यात्रा महोत्सवाला विविध कार्यक्रमाने प्रारंभ होणार असून यात्रोत्सवामध्ये महापुजा, नगर प्रदक्षणा लाहीचा कार्यक्रम, किर्तन, महाप्रसाद तसेच भव्य कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आह.
१३ मार्च रोजी सकाळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘श्रीं’ची महापूजा होणार आहे. तसेच १४ रोजी फडकºयाकडून सकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाणार असून दुपारी ३ वाजता ‘श्रीं’ची पालखी नगर प्रदक्षणा टाळ, मृदंगाच्या गजरात निघणार आहे. १५ रोजी दुपारी १२ वाजता लाहीचा कार्यक्रम होईल. १९ रोजी कुस्त्यांची भव्य स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी खा. राजीव सातव तर प्रमुख पाहूणे आ. रामराव वडकुते, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. गजानन घुगे, प्रकाश थोरात, भैय्या पाटील गोरेगावकर, रामरतन शिंदे, संतोष टेकाळे, रामेश्वर शिंदे, वनमाला सोळंके, सपोनि बालाजी येवते यांची उपस्थिती राहणार आहे.
कुस्ती स्पर्धेचे प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये, द्वितीय ७ हजार ७७७ रुपये, तृतीय ५ हजार ५५५ रुपये, चौथे ४ हजार ४४४ रुपये, पाचवे ३ हजार ३३३ रुपये, सहावे २ हजार २२२ रुपये, सातवे ११०० रुपये ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेचे पंच म्हणून तुळशीराम काकडे, पांडुरंग टेकाळे, तुळशीराम गवते, दत्तराव वरणे, सखाराम मोरे, त्र्यंबकराव मोरे, भिकाजी धाबे, सत्तारखॉ पठाण, सुरेश काळे, विष्णू ढेंगळे हे काम पाहतील. या यात्रेच्या व यात्रेतील कार्यक्रमाचा पंचकोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान व समस्त ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी येणाºया भाविकांचे दर्शन व्हावे यासाठी ग्रामस्थ व काही युवक मंडळी प्रयत्न करणार आहेत. तसेच आरोग्य विभागही सज्ज असणार आहे.
नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांची यात्राही फार पुर्वीपासून मीठाची यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेमध्ये येणारे भाविक यात्राकरू हे वर्षभर पुरेल एवढे मीठ प्रसाद म्हणून सोबत नेत असत. विशेष म्हणून मोहºया, आंबाड्या, एरंड्या, बीब, बरू, मटकी आदी धान्याच्या बदल्यात हे मीठ मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते. परंतु आज घडीला धान्याच्या बदल्यात मिठाची खरेदीचे प्रमाण खुपच कमी होत असल्याने मीठाची विक्रीही फारच कमी प्रमाणात होत आहे. कालांतराने येथील मिठाची यात्रा ही केवळ नावापूरतीच राहते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.