ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:33 AM2021-08-13T04:33:51+5:302021-08-13T04:33:51+5:30
हिंगोली : कोरोना काळात महागाई कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या काळात तर महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस, ...
हिंगोली : कोरोना काळात महागाई कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या काळात तर महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल दर वाढीनंतर आता साखरेच्या किमतीतही क्विंटलमागे ५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. महागाईमुळे दैनंदिन बजेट कोलडले आहे.
का वाढले भाव
मागील सहा महिन्यांपासून साखरेच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. सध्या ३४०० रूपये प्रति क्विंटल दराने साखर विक्री होत आहे. सण, उत्सव असले तरी साखरेची मागणीत कोणतीही वाढ नसल्याचे एका व्यापारऱ्याने सांगितले.
खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. साखरेच्या किमतीत हिंगोलीत तरी कोणतीही वाढ झाली नाही. सध्या ३४०० ते ३५०० रूपये प्रति क्विंटल साखर विक्री होत आहे. मागील काही दिवसांपासून साखर वाढली नसल्याचे एका ठोक विक्रेत्याने सांगितले.
दरातही आढळते तफावत
ठोक व्यापारी ३४०० ते ३४५० रूपये साखरेचे दर असल्याचे सांगत असले तरी हिंगोली शहरातच ठिकठिकाणी प्रति किलो ३५ रूपयांपासून ते ३८ रूपयांर्यंत साखर विक्री होत आहे.
महिन्याचे बजेट वाढले
खाद्यतेल, गॅसचे दर वाढल्याने अगोदरच सर्व सामान्य मेटाकूटीला आले आहेत. आता साखरेचे दर किंचित वाढले असले तरी यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
- स्मिता कोल्हे
मागील काही दिवसांपासून महागाई चांगलीच वाढली आहे. महिन्याचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. आता ऐन सणासुदीत साखरेचे भाव वाढले आहेत.
- अश्विनी आठवले