कावड यात्रेत तलवार उंचावली, डीजे लावला; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा
By विजय पाटील | Published: August 29, 2023 03:22 PM2023-08-29T15:22:01+5:302023-08-29T15:23:16+5:30
आ.संतोष बांगर व डीजेचालकावर कळमनुरी पोलिसांत गुन्हा नोद करण्यात आला आहे.
हिंगोली : कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत जनसमुदायासमोर हातात तलवार घेवून उंचावल्याने व डीजे लावल्याने आ.संतोष बांगर व डीजेचालकावर कळमनुरी पोलिसांत गुन्हा नोद करण्यात आला आहे.
२८ ऑगस्ट रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आ.संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. या कावड यात्रेत हिंगोली ते कळमनुरी मार्गावर ऋषि ढाब्याजवळ आ. बांगर यांनी हातत तलवार घेवून हवेत वार केले. दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्याचबरोबर हिंगोली शहर पोलिसांनी डीजे लावण्यास प्रतिबंध असल्याची नोटीस आधीच दिली होती. तरीही या कावड यात्रेत डीजे लावण्यात आला होता. त्यामुळे बांगर यांच्यासह रिसाला बाजार भागातील रवी शेषराव धुळे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार सतीश पांडुरंग शेळके यांनी तक्रार नोंदविली आहे. तपास पोलिस निरीक्षक मुंडे ही करीत आहेत.