राकाँचे तोंडाला काळ्या फिती बांधून मौनव्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:43 AM2018-10-03T00:43:56+5:302018-10-03T00:44:23+5:30

राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील गांधी चौकात राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव’ जवाब दो यासाठी काळ्या फिती बांधून मौनव्रत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

 Tackle black bucket with silken face | राकाँचे तोंडाला काळ्या फिती बांधून मौनव्रत

राकाँचे तोंडाला काळ्या फिती बांधून मौनव्रत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील गांधी चौकात राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव’ जवाब दो यासाठी काळ्या फिती बांधून मौनव्रत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.
देशात अशांतता असून सनातन्यांनी केलेली हिंसा याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा खूनाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा या प्रश्नांचे सरकारने कोणताही जवाब दिला नाही. तसेच पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. युवकांच्या नोकºयाबाबतही जबाब दिला नाही. त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेसतर्फे मौनव्रत धारण करून जवाब दो आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सरकारवर निशाणा साधत सध्या संविधान बदलण्याचा घाट सुरू असल्याचे ते म्हणाले. सर्व जातीधर्मांतील लोकांसाठी जसा एक धार्मिक ग्रंथ असतो, त्याचप्रमाणे भारतीयांसाठी संविधान हा ग्रंथ आहे; परंतु सध्याचे शासन संविधान बदलण्याचा घाट रचत आहे. त्यामुळे राज्यभरात संविधान बचाव व जवाब दो आंदोलन राष्टÑवादी काँग्रेसतर्फे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, माजी आ. पंडितराव देशमुख, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजितराज खुराणा, मनीष आखरे, माधव कोरडे, जावेदराज, अनिता सूर्यतळ, बिरजू यादव, अ‍ॅड. सुनील भुक्तर, अमेर अली, महेंद्र धबाले, बी. डी. बांगर, स्वप्नील गुंडेवार, सुमित्रा टाले, अप्पासाहेब देशमुख, बापूराव बांगर, विलास गोरे, सुजय देशमुख, अमित कळासरे, संचित गुंडेवार, संतोष गुठ्ठे, विनोद नाईक, जुबेर मामू, देशमुख, ज्ञानेश्वर काळे, यांच्यासह राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी मौनव्रत, जवाब दो आंदोलनात काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले.

Web Title:  Tackle black bucket with silken face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.