मुजोर वाळूमाफीयावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:51 AM2021-02-05T07:51:35+5:302021-02-05T07:51:35+5:30
हिंगोली : उमरखेड येथील एका वाळूमाफीयाने नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला. या निषेधार्थ जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने ...
हिंगोली : उमरखेड येथील एका वाळूमाफीयाने नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला. या निषेधार्थ जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने वाळूमाफीयावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना देत एक दिवसाचे रजा आंदाेलन केले.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील शासकीय कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मुजोर वाळूमाफीयाला अटक करुन त्याच्यावर कठाेर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून २ फेब्रुवारी रोजी संघटनेच्या सर्व सदस्यांनी सामूहिक आंदोलन केले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार कृष्णा कानगुले, तहसीलदार जीवककुमार कांबळे, तहसीलदार संदीप राजापुरे, नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे, नायब तहसीलदार के. एम. विरकुंवर, नायब तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार गळगे आदींच्या सह्या आहेत.
फोटो नं. १४