‘वाढत्या उन्हात कोंबड्यांची काळजी घ्यावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:10+5:302021-04-22T04:31:10+5:30
भाजीपाल्याला वेळेवर पाणी देण्याचे आवाहन हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन भाजीपाला पिकाला ...
भाजीपाल्याला वेळेवर पाणी देण्याचे आवाहन
हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन भाजीपाला पिकाला सकाळी पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास भाजीपाल्याची नासाडी होते. तेव्हा भाजीपाला उत्पादकांनी योग्य प्रमाणातच पाणी द्यावे, असे आवाहन कृषीतज्ज्ञांनी केले आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरात भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित करु नये, अशी ग्राहकांनी विनंती करुनही वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
शेती मशागतीची कामे सुरु
औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेती मशागतीची कामे सुरु आहेत. यामध्ये खत टाकणे, काशा वेचणे, नांगरणी करणे, आदींचा समावेश आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतकरी दुपारी बारा वाजेपर्यंतच शेतातील कामे उरकून घेत आहेत. काही शेतकरी ऊन उतरल्यानंतर शेती मशागतीची कामे करत आहेत.