दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:32 AM2018-11-05T00:32:32+5:302018-11-05T00:32:56+5:30
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या संशयास्पद मृतदेह आंबा चौकी येथे सापडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या संशयास्पद मृतदेह आंबा चौकी येथे सापडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
आंबा चौकी येथे वनविभागाच्या कार्यालय परिसरात संशयास्पद अवस्थेत नागराज खंदारे (२८) यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी श्वान पथकही पाचारण केले होते. हे प्रकरण संशयास्पद होते; परंतु मयताच्या मरणाचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. शवविच्छेदनाचा अहवालही आला नव्हता. संशयास्पद प्रकरणाची चौकशीतून धागेदोरे हाती लागल्याने काहींना ताब्यात घेतले होते. त्यातून घटनाक्रम समोर आलेला होता. गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणी कसून चौकशी सुरू होती. त्यातून प्रकरणाचा छडा लागला आहे. परंतु मरणाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या प्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. काहींची चौकशीकरिता विचारपूस करण्यात आली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे हा प्रकरण चर्चेत आला होता. मयत हा ३१ आॅक्टोबरच्या दुपारपासून गायब होता. त्यानंतर त्याचा मृतदेह सकाळी १ नोव्हेंबर रोजी आढळला होता. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मयत हा मिस्त्री काम करीत होता. या प्रकरणी घातपाताचा संशय पूर्वीपासून व्यक्त होत असल्याने त्या दृष्टिकोनातून विविध प्रकारची चौकशी पोलिसांनी केली आहे. धागेदोरे हाती लागल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.