हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दौ-यात ‘दे धक्का’ची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:36 PM2017-12-28T23:36:22+5:302017-12-28T23:36:26+5:30

पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत.

Talk about 'De Dhakka' in Hingoli Guardian's tour | हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दौ-यात ‘दे धक्का’ची चर्चा

हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दौ-यात ‘दे धक्का’ची चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देदुरावा निर्माण होण्याची चिन्हे : एकाला बळ, दुसºयाची नाराजी, भाजपकरही झाले हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत. तर काहींनी हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे रसभरीत वर्णन करीत आज दिवसभर मनोरंजन केले.
पालकमंत्री दिलीप कांबळे हे नव्यानेच येथे आले तेव्हा भाजपचे युवा नेते रामरतन शिंदे हे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांनी शिंदे यांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतर शिंदे हे भाजप सोडण्याच्या मानसिकतेत होते. मात्र नंतर त्यांचे पालकमंत्र्यांशी सूर जुळाले. शिंदे यांच्या पत्नी संगीता या जि.प.ला निवडून आल्या अन् पालकमंत्र्यांना शिंदे यांच्या ताकदीचा अंदाजही आला म्हणून की काय ते अधिक विश्वासू बनले. त्याचदरम्यान जिल्ह्यातील इतर पक्षाच्या आमदारांनी पालकमंत्री कांबळे यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले. तेव्हा आ.मुटकुळे यांची भूमिका संदिग्ध वाटत असल्याचा संशय कांबळे यांना आला. मात्र कांबळे यांनी मुटकुळे यांच्याशी संबंधात तसूभरही फरक पडू न देता शिंदे यांच्यामागे बळ उभे करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत.
शिंदे यांनी आयोजित केलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमासही मंत्र्यांनी बुधवारी हजेरी लावली. मात्र हिंगोलीत भाजपच्याच नेत्यांच्या पुढाकाराने व आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेकडे ते फिरकलेही नाहीत. पालकमंत्र्यांच्या दौºयात ते जवळ्यातील कीर्तनाला हजेरी लावणार असल्याचे नमूद असल्याने इतरांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. मात्र भाजपमधीलच काही जणांनी ही बाब सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. यात आमदारांना विरोध करायचाय की शिंदे यांच्या वाढत्या प्रस्थाला सुरुंग लावायची तयारी चाललीय, हे कळायला मार्ग नाही. मात्र शिंदे आगामी विधानसभेच्या मैदानात षड्डू ठोकणार असल्याच्या उडणाºया वावड्यांना यातून पुष्टीच दिली जात आहे. आगामी काळात या प्रकाराचे पडसाद नक्कीच दिसतील. तोपर्यंत मात्र या चर्चांना पूर्णविराम शक्य नाही.
थंडीमध्येही भाजपत गरमाहट
पालकमंत्र्यांच्या दौºयानंतर सुरू असलेल्या चर्चांमुळे कडाक्याच्या थंडीतही भाजपमधील वातावरणात गरमाहट दिसून येत आहे. जो-तो आपापल्या परीने या घटनेचा अन्वयार्थ मांडत आहे.

Web Title: Talk about 'De Dhakka' in Hingoli Guardian's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.