गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे ठरतेय जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:05+5:302021-07-28T04:31:05+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील खराब रस्ते व समोरील वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसे मोबाइलवर बोलत वाहन चालविल्यानेही ...
हिंगोली : जिल्ह्यातील खराब रस्ते व समोरील वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसे मोबाइलवर बोलत वाहन चालविल्यानेही अपघातात भर पडत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. मात्र, अनेक वाहनचालक मोबाइलवर बोलत वाहने चालवीत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. खराब रस्ते जसे अपघाताला कारणीभूत ठरताहेत, तसेच मोबाइलवर बोलण्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांमुळे समोरील व्यक्तीलाही जखमी व्हावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना
मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेला ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे गत दीड वर्षापासून ब्रेथ ॲनालायझरचा वापर करणे बंद झाले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांना रान माेकळे झाले आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांमध्ये मद्यपी वाहनचालकांचाही समावेश आहे. यातून अपघात होत आहेत.
हिंगोली शहरात २० अपघात
हिंगोली शहरात जिल्हाभरातून नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनाने येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. मागील दीड वर्षात हिंगोली शहरात अपघातांच्या २० घटना घडल्या. यात अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश जखमी झालेल्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. दरम्यान, हेल्मेट न घालता व मोबाइलवर बोलताना अपघात झाला असा अनेक वेळा नोंद घेतली जात नाही.
२०२० मध्ये जिल्ह्यात झालेले अपघात
अपघात - २३३
जखमी -२२५
मृत्यू - १२५
या वर्षात केलेला दंड प्रकरणे दंड
वाहन चालविताना मोबाइल वापर- ६२३ १२४६००
नो पार्किंग- ६३९९ १२७९८००
अधिक वेग ३९६८ ३९६८०००
ट्रिपल सीट २५२७ ३०५४००
धोकादायक वाहन चालविणे- ७३९ ७३९०००
वायुप्रदूषण-