तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:28 AM2021-05-17T04:28:23+5:302021-05-17T04:28:23+5:30
तालुक्यातील पाणबुडी वस्ती, महालिंगी तांडा, माळधावंडा या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील २८ गावांतील ३० अधिग्रहणाचे ...
तालुक्यातील पाणबुडी वस्ती, महालिंगी तांडा, माळधावंडा या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील २८ गावांतील ३० अधिग्रहणाचे प्रस्ताव स्थळ पाहणीनंतर तहसीलदारांनी मंजूर केले आहेत. पंचायत समितीकडे ३७ गावांचे ४७ अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. ४० अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीने मंजुरीसाठी तहसीलदारांकडे पाठविले आहेत. त्यापैकी ३० अधिग्रहणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात ११७० हातपंप असून, अनेक हातपंप पाण्याअभावी तर काही दुरुस्तीअभावी बंद आहेत. अजूनही हातमाली येथील टँकरचया प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. तालुक्यात सध्या पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली असून, संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून पाणीटंचाईची आढावा बैठक झालेली नाही. त्यामुळे किती गावात पाणीटंचाईची समस्या आहे व त्यावर काय उपाययोजना कराव्यात कळायला मार्ग नाही.