तरूणास तलवारीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:43 IST2019-04-16T00:43:08+5:302019-04-16T00:43:23+5:30
येथील सत्याग्रह चौकात एका तरूणास तलवारीने मारून जखमी केल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून वसमत शहर ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरूणास तलवारीने मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील सत्याग्रह चौकात एका तरूणास तलवारीने मारून जखमी केल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून वसमत शहर ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार वसमत येथील रहिवासी संतोष पोले यास १३ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास सत्याग्रह चौक परिसरात डोक्यात व हातावर तलवार मारून जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी १५ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली आहे. संतोष पोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून माधव व अन्य एक अनोळखी इसम अशा दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यासत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा सदर घटनेचा तपास सपोनि सय्यद आझम करीत आहेत.