न.प.ची साडेनऊ लाखांची करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:45 AM2018-02-05T00:45:26+5:302018-02-05T00:45:34+5:30
येथील न. प. तर्फे मालमत्ता कर वसूलीसाठी ३ पथके तयार केली आहेत. त्या पथकाने आतापर्यंत ९ लाख ४९ हजार कर वसूली केल्याची माहिती न.प.च्या सुत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील न. प. तर्फे मालमत्ता कर वसूलीसाठी ३ पथके तयार केली आहेत. त्या पथकाने आतापर्यंत ९ लाख ४९ हजार कर वसूली केल्याची माहिती न.प.च्या सुत्रांनी दिली.
न.प.चे पथक, मालमत्ता, शिक्षण, वृक्ष संवर्धन, रोजगार हमी योजना, नळ पट्टी, दिवाबत्ती, स्वच्छता कर, नगर परिषद मालकीची गाळे व इमारत भाड्याचे कर वसूली करत आहेत. न.प.ची एकुण थकाबाकी ५५ लाख ९० हजार आहे. मागील वर्षाची थकबाकी १२ लाख ६९ हजार असून त्यात चालू वर्षाची थकबाकी ४३ लाख २१ हजार आहे. न.प.च्या तीन पथकाने आतापर्यंत ९ लाख ४९ हजाराची कर वसूली केली असून ही टक्केवारी १६.९७ टक्के आहे. यावर्षी शंभर टक्के वसूलीसाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद व जिल्हाधिकारी हिंगोली यांनी थकबाकीदारांकडून १०० टक्के कर वसूली करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. तसे स्मरणपत्रही न.प.च्या मुख्याधिकाºयांना पाठविले आहे. यापुढे न.प.चे पथक घरोघरी जावून मालमत्ता कर वसूली करणार आहेत. सोमवारी न.प.च्या वतीने कर वसूली भरण्यासाठी दवंडीही दिली. येत्या दोन दिवसात लाऊडस्पिकर लावून वसूली कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे. तसेच शहरातील शासकीय कार्यालयांना आठ ते दहा दिवसांपुर्वी कर भरण्यासाठी पत्राद्वारे न.प.च्या वतीने कळविण्यात आलेले आहे. या महिन्यात न.प.ने ४ लाख ६३ हजार रुपयाची कर वसूली केली आहे. या आर्थिक वर्षात न.प.ने मालमत्ता कराची १९.९६ टक्के, शिक्षण १२.०४ टक्के, वृक्ष संवर्धन ८.६९ टक्के, रोजगार हमी योजना ९.२५ टक्के, सर्वसाधारण पाण्यावर कर १०.८ टक्के, दिवाबत्तीवरील कर ११.१९ टक्के, स्वच्छता कर ११.१९ टक्के, पाणी पुरवठा कर १६.५६ टक्के तर नगर परिषद मालकीच्या दुकाने, गाळे व इमारत भाड्याची ३५. ८९ टक्के कर वसूली केली आहे. मार्च अखेर १०० टक्के कर वसूलीचे उद्दीष्ट आहे.
न.प.ने कर वसूलीसाठी तीन पथके तयार केली असून या पथकामार्फत कर वसूली होत आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याअखेर ८० टक्के कर वसूली करण्यात येणार आहे. कर भरण्यासंदर्भात नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहे. यावर्षी १०० टक्के वसूली करण्याचे उद्दीष्ट वरिष्ठांनी दिले आहे. ते मार्च अखेर पर्यंत उद्दीष्ट कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करण्यात येणार आहे. कर वसूलीसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रविण ऋषी, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांनी केले.