शिक्षकाने मागितली इच्छामरणाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:02 AM2018-11-03T00:02:24+5:302018-11-03T00:02:53+5:30
तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे.
खानापूर (चित्ता) येथील शाळेतील शिक्षक मारोती श्रावण रोकडे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००६ पासून त्यांना मानसिक छळ केला जात असून वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. प्रभारी मुख्याध्यापक जाणीवपूर्वक त्रास देत असून वेतनही काढत नाही. त्यामुळे कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.
शाळा न्यायधिकरण लातूर यांनी सह-शिक्षक म्हणून रोकडे यांना मान्यता देऊन थकीत वेतन अदा करण्याचे आदेशही दिले आहेत. परंतु प्रत्येक्षात मात्र जाणीवपूर्वक छळ करून वेतन दिले जात नाही. या नेहमीच्या वारंवार होणाºया त्रासाला कंटाळून आता प्रशासनाने कुटुंबियासहित इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मारोती रोकडे यांनी केली आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या प्रकरणांची चौकशीही करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिक्षक मारोती श्रावण रोकडे यांची स्वाक्षरी आहे.