प्रत्येक तालुक्यात भरणार शिक्षक दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:33+5:302021-08-24T04:33:33+5:30
एकलारे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी ते म्हणाले, वसमतला पहिला शिक्षक दरबार घेण्यात आला. आता इतर तालुक्यांतही हा ...
एकलारे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी ते म्हणाले, वसमतला पहिला शिक्षक दरबार घेण्यात आला. आता इतर तालुक्यांतही हा उपक्रम राबवून समस्या जाणून घेतल्या जातील. त्यांचे एकत्रीकरण करून त्या सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. यावेळी एक केंद्र एक केंद्रप्रमुख हा फॉर्म्युला राबविण्याचा ठराव घेतला. सध्या ६४ केंद्रांसाठी १७ केंद्रप्रमुख आहेत. एकेकाकडे तीन ते चार पदभार आहेत. मात्र ते यापुढे स्वत:चे १७ केंद्रच सांभाळतील. इतर ठिकाणी निकष पात्र शिक्षकांना पदभार देण्यात यावा, असा ठरावही घेतला. त्याचबरोबर माध्यमिक विभागाची संच मान्यता मागील अनेक वर्षांपासून झाली नाही. परिणामी, अनेक शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकांवर कारभार चालवावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी लवकरात लवकर सुधारित संच मान्यता करण्याचा ठरावही घेण्यात आला. शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर रोजीच वितरित होण्यासाठी निवड प्रक्रिया व इतर बाबी वेळेत पूर्ण करण्यासाठीही चर्चा करण्यात आली. तर आलेल्या प्रस्तावांवर उद्या बैठक घेण्यात येणार आहे.
माध्यमिक शिक्षकांचे समायोजन, अराजपत्रित मुख्याध्यापक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती तत्काळ करणे, शाळांसाठी संरक्षण भिंत, शौचालय, पिण्याचे पाणी यासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध करून देणे आदी विषयांवर चर्चा व ठराव संमत करण्यात आले.
यावेळी सदस्य अनिल पंतगे, रेणुका जाधव , भगवान खंदारे, परिहार, निमंत्रित सदस्य सुभाष जिरवणकर, ज्ञानेश्वर ठाकरे ,शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के व सर्व गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते, नवनियुक्त सदस्य आणि बदलीने वसमत येथे आलेल्या गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .