शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:24+5:302021-01-20T04:30:24+5:30
जिल्ह्यात साडेतीन हजारच्या जवळपास प्राथमिक शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन रखडलेले आहे. वेतन वेळेवर होत नसल्याने ...
जिल्ह्यात साडेतीन हजारच्या जवळपास प्राथमिक शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन रखडलेले आहे. वेतन वेळेवर होत नसल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दर महिन्याला शिक्षकांच्या वेतनाला उशीर होत आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले. वेतन वेळेवर येत नसल्याने बँक, पोस्टाचे हप्ते, कर्ज हप्ते थकलेले आहेत. शिक्षक जिल्हा परिषदेकडे वेतनाचा निधी आला की नाही याची विचारणा करीत आहेत. वेतन वेळेवर होत नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. शिक्षकांचे वेतन दर एक तारखेला करावे, असे आदेश असतानाही याकडे प्रशासन काणाडोळा करीत आहेत. शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्याची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश नीळकंठे यांनी केली आहे. वेतन वेळेवर न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नीळकंठे यांनी दिला आहे.