शिक्षकाची सव्वा दोन लाखांची रक्कम लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:59+5:302021-09-21T04:32:59+5:30
सेनगाव तालुक्यातील कवठा येथील शिक्षक विष्णूदास काशीराम चोपडे हे २० सप्टेंबर रोजी सेनगाव येथे आले होते. त्यांच्याकडे नॉयलॉनच्या थैलीत ...
सेनगाव तालुक्यातील कवठा येथील शिक्षक विष्णूदास काशीराम चोपडे हे २० सप्टेंबर रोजी सेनगाव येथे आले होते. त्यांच्याकडे नॉयलॉनच्या थैलीत २ लाख २५ हजार रुपयांची रक्कम होती. दुपारी त्यांची दुचाकी पंक्चर झाल्याने लक्षात आल्याने त्यांनी दुचाकी आजेगाव टी पॉईंटजवळील एका दुकानात पंक्चर काढण्यासाठी उभी केली. यावेळी रक्कम बाजूला ठेवून पंक्चर पाहण्यासाठी गेले. त्यानंतर ते परत आले असता त्यांनी बाजूला ठेवलेली सव्वा दोन लाखांची रक्कम असलेली नॉयलॉनची थैलीच चोरट्यांनी लांबविल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी पैशाची थैली लांबविल्याचे स्पष्ट होताच त्यांनी सेनगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या बाबतची तक्रार पोलीस हवालदार सुरेश पाईकराव यांनी नोंदवून घेतली. याप्रकरणी विष्णूदास चोपडे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हवालदार झळके करीत आहेत.