जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:56+5:302021-04-26T04:26:56+5:30

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने ९० रुग्ण आढळले असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १७८ रुग्ण बरे झाल्याने ...

Ten patients died of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने ९० रुग्ण आढळले असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हिंगोली परिसरात १०७ जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी केली असता त्यात सात रुग्ण आढळून आले. यात ढोलक्याची वाडी १, भिरडा ३, यशवंत नगर १, भानखेडा २ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात गिरगाव १, वसमत १ असे दोन रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात ७० पैकी ७ रुग्ण आढळले असून, यात पिंप्री २, कस्बे धावंडा १ यांचा समावेश आहे. सेनगाव परिसरात ६० पैकी ७ रुग्ण आढळले असून, सेनगाव २, कापडसिंगी २, गोरेगाव १, लिंगदरी १, जयपूर १ रुग्ण आढळले. औंढा परिसरात ७८ पैकी १० रुग्ण आढळले. यात जवळा बाजार ७, औढा येथील ३ रुग्ण आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये ६१ रुग्ण आढळले. यात हिंगोली परिसरात अकोला बायपास १, जिजामाता नगर २, कानखेडा १, विद्यानगर ३, भानखेडा १, माळधामणी १, जोडपिंप्री १, माधव हॉस्पिटल १, बियाणी नगर १, गंगानगर १, बासंबा १, हेमराज गल्ली १, नर्सिंग कॉलेज १, एसआरपीएफ २, आशीर्वाद नगर १, विवेकानंद नगर १, माळधामणी १, चिंचोली १, खुशालनगर १, नारायण नगर १, कळमनुरी १, हिंगोली ४, शिरडशहापूर १, यशवंतनगर हिंगोली, १, जिजामातानगर ६, माळधामणी १, वंजारवाडा १, वाई कळमनुरी १, बळसोंड १, गंगानगर २, मंगळवारा २, शिवाजी नगर १, सारडा किराणा सेनगाव २, नारायण नगर ३, बियाणी नगर १, श्रीनगर १, असोली, वाकोळी १, जडगाव १, आनंद नगर २ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात भोरा १, कळमनुरी परिसरात सिंदगी १, नांदापूर १ अशा एकूण ६१ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी १७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात जिल्हा रुग्णालय ३५, लिंबाळा २२, वसमत ३४, कळमनुरी ५३, औंढा १०, सेनगाव २४ यांचा समावेश आहे. आजपर्यंत ११ हजार ६५८ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यापैकी १० हजार ७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या १३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मृतांचा आकडा पोहोचला १९६ वर

जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्ण दगावले. यात हिंगोली आयसोलेशन ‌वाॅर्डात उपचार घेणाऱ्या चिखली (ता. कळमनुरी) ६५ वर्षीय पुरुष, वाढोणा (हिंगोली) येथील ६५ वर्षीय पुरुष, वापटी (ता. वसमत) येथील ६३ वर्षीय महिला, खुडज (ता. सेनगाव) येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथे उपचार घेणाऱ्या डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील ६५ वर्षीय महिला, नवीन कोविड हॉस्पिटल हिंगोली येथे उपचार घेणाऱ्या हिंगणी येथील ६८ वर्षीय महिला, देवाळा येथील ७४ वर्षीय पुरुष, डेडिकेटेड कोविड सेंटर सिद्धेश्वर येथे उपचार घेणारे उकळी (ता. औंढा) येथील ७० वर्षीय व ६५ वर्षीय पुरुष, महेश हॉस्पिटल हिंगोली येथे उपचार घेणाऱ्या कळमनुरी येथील ७० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९६ झाली आहे. सध्या ४५० रुग्णांना ऑक्सिजन, तर ४४ रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Ten patients died of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.