पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला दहा जणांना चावा; नागरिकांत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 07:07 PM2021-07-19T19:07:52+5:302021-07-19T19:08:11+5:30
जखमींवर हिंगाेली येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहा जणांना चावा घेतला आहे. यामुळे गावातील भटके कुत्रे व पिसाळलेल्या कुुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साेमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका पिसालेल्या कुत्र्याने गावात प्रवेश करत, एक वयाेवृध्द, दाेन मुली व इतर बालकांना चावा घेतला आहे. यामध्ये दगडुजी बराटे यांना जास्त जखमी केले आहे. तसेच आदिनाथ अनिल हलगे, वेदिका विकास कऱ्हाळे, अर्पिता पांडूरंग गिराम, सिध्दनाथ भगवान कऱ्हाळे, वेदिका गजानन खांडेकर, शिवाजी रूस्तुम कऱ्हाळे यांनाही चावा घेतला आहे. यानंतरही पिसाळलेला कुत्र्यानी गावातील गल्लीबोळात शिरत अनेकांच्या अंगावर जात चावा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक पाळीव कुत्र्यांना सुद्धा चावा घेतला आहे. जखमींना हिंगाेली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते.
वाटेमध्ये आलेल्यांवर धाव घेत भीती निर्माण केली हाेती. यामुळे गावात दिवसभर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. या पिसालेल्या कुत्र्याला मारण्यासाठी गावातील युवकांनी पाठलाग केला असता, कुत्र्याने पळ काढत गावाबाहेर धाव घेतली. मात्र भीती कायम असल्याने त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे.