दहावीचे मूल्यांकन शाळांनी दिले, आता निकालाची लागली प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:40+5:302021-07-15T04:21:40+5:30

हिंगोली जिल्ह्यात १५३ शाळांतील जवळपास १८४०७ विद्यार्थी दहावीला होते. यात मुले १०२१४, तर मुली ९१९३ होत्या. या सर्व विद्यार्थ्यांना ...

The tenth assessment was given by the schools, now the result is awaited | दहावीचे मूल्यांकन शाळांनी दिले, आता निकालाची लागली प्रतीक्षा

दहावीचे मूल्यांकन शाळांनी दिले, आता निकालाची लागली प्रतीक्षा

Next

हिंगोली जिल्ह्यात १५३ शाळांतील जवळपास १८४०७ विद्यार्थी दहावीला होते. यात मुले १०२१४, तर मुली ९१९३ होत्या. या सर्व विद्यार्थ्यांना यंदा बोर्डाची परीक्षा कोरोनामुळे देता आली नाही. ऑनलाईन परीक्षेसाठीही बोर्डाने नियोजनाची तयारी केली होती, मात्र ते प्रत्यक्षात उतरले नाही. शाळांवरच निकालाची जबाबदारी दिली, तर ते काम जिल्ह्याने पूर्ण केले असले तरीही, इतरत्र झाले नसल्याने निकाल रखडला आहे.

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी १९४०७

एकूण मुले १०२९४

मुली ९१९३

जिल्ह्यातील शाळा १५३

मूल्यांकन झालेल्या शाळा १५३

जुनी गुणपत्रके मिळत नसल्याने अनेक शाळांना मूल्यांकन करताना अडचणीचे गेले. मात्र यासाठी मुलांना वारंवार संपर्क साधून त्यांच्याकडून ही माहिती मिळवावी लागली. यात अनेक शाळांचा वेळ गेला. काहींनी अंतर्गत गुणांवरूनच सरासरीत गुण दिले.

मुख्याध्यापक म्हणतात...

बऱ्याच जणांच्या गुणांच्या नोंदी ऑनलाईनमुळे सहज मिळाल्या. काहीबाबतीत अडचणी आल्या, तर त्या प्रत्यक्ष संपर्क साधून गुण मिळविले. बोर्डाशीही समन्वय ठेवून ऑनलाईन निकाल सादर केला. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

- के. के. गांजवे, मुख्याध्यापक

नियमित चाचण्या घेतल्या असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करताना काही अडचणीचे गेले नाही. प्रत्येक शिक्षकाने आपली जबाबदारी उचलली. त्यामुळे वेळेत ऑनलाईन केले. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

- एस. जी. पारणकर, शिक्षक

सर्व शाळांनी मूल्यांकन भरले

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अडचणी असल्यास त्या सोडविण्यात आल्या. त्यामुळे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. निकालाची तारीख जाहीर होणे बाकी आहे.

- पी. बी. पावसे

Web Title: The tenth assessment was given by the schools, now the result is awaited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.