धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:18 IST2019-01-20T00:18:19+5:302019-01-20T00:18:44+5:30
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत.
रामलीला मैदानावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आंनदराव जाधव, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राम कदम आदींनीही भेट दिली. यावेळी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी अशोक नाईक, चंदू लव्हाळे, परमेश्वर मांडगे आदींची उपस्थिती होती.
धनगर समाजबांधवांच्या आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. तर नाईक यांनी वाशिम येथे होणाºया आंदोलनातही समाजबांधवांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
यावेळी आंदोलकांनी यळकोट.. यळकोट... जय मल्हार... च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. ग्रामीण भागातूनही नागरिक आले होते. जिल्हा प्रशासनालाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.