शेतात थाटला महाजुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात शिक्षकासह २५ जुगारी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:13 PM2022-09-07T12:13:24+5:302022-09-07T12:14:03+5:30
पोलिसांनी रोकडसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
वसमत (हिंगोली) : तालुक्यातील तुळजापुरवाडी शिवारात चालणाऱ्या महाजुगार अड्डयावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने मंगळवारी ( दि.६ ) सायंकाळी छापा मारला. यावेळी पोलिसांनी २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यात एक शिक्षक असल्याची माहिती आहे. तर २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
वसमत तालुक्यातील तुळजापुरवाडी शिवारात शेतकरी दिलीप गणेश चव्हाण याच्या शेतात पत्राच्या शेडमध्ये अंदरबाहर नावाचा जुगार अड्डा सुरु होता. याबाबत माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी ७ वा विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच ६ लाख ८४ हजार रोकड, १० दुचाकी, २ कार असा एकूण २० लाख ३४ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नांदेड जिल्हयातील कुंटुर पोलीस ठाण्याचे फौजदार दिनेश येवले यांच्या फिर्यादीवरुन आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले जुगारी:
बिटासिंग नखुसिंग बावरी (रा झरी),
लक्ष्मण राजानरसु गडप्पा रा रामकृष्ण नगर परभणी,
गजानन गंगाधर दुधारे रा.फुकटगाव ता. पुर्णा जि.परभणी,
गणेश अच्युतराव कदम रा.पुर्णा जि.परभणी,
संजय मधोजी टेकोळे रा गौतम नगर परभणी,
काशिनाथ सोपानराव चव्हाण रा. आडगाव,
सागर तुकाराम मुंठे रा गौतम नगर परभणी,
विशाल रामदास भिमरवार रा वसमत,
दामोदर अमृतराव सावंत रा. बळेगाव ता. वसमत,
गंगाधर गोमाजी मानवतकर ( ४८, व्यवसाय शिक्षक रा जवळा बाजार,
विरसिंग मायासिंग दुधाणे रा झरी ता परभणी,
संजय शेषराव थोरात रा विश्वा कार्नर परभणी,
व्यंकटेश रमेश वानखेडे रा संत तुकाराम नगर परभणी,
संजय दिगांबर घाडगे रा जिंतुर रोड परभणी,
गजानन विठलराव चव्हाण रा आडगांव रंजे ता वसमत,
विनय रमेश लहाणे व्यवसाय शिक्षण रा गौतमनगर परभणी,
वैभव विश्वनाथ झोडपे रा महादेव नगर परभणी,
माणिक लक्ष्मणराव कदम रा गणपती मंदिराजवळ पुर्णा,
सिध्दांत बापुराव एंगडे रा.मातोश्री नगर परभणी,
पंकज रामराव पांढरे रा गणेश पेठ वसमत,
श्रीकांत भिमराव खाडे रा हटा,
गंगाधर कदरप्पा पतीकोंडा रा माधव नगर परभणी,
दिगांबर तुकाराम जाधव रा कुरझाळ ता औंढा,
ललित वसंत कांबहे रा गौतम नगर परभणी