पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला; आरोग्य तपासणीदरम्यान दवाखान्यातील प्रकार
By यशवंत भीमराव परांडकर | Published: November 10, 2022 12:48 PM2022-11-10T12:48:45+5:302022-11-10T12:49:23+5:30
पोलीस ठाण्यासमोरील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले तेव्हा परत येताना आरोपी पळाला
नर्सी नामदेव (जि. हिंगोली): हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला रक्ताचे नमुने घेण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले होते या ठिकाणी रक्ताचे नमुने घेतल्यानंतर तीन आरोपींना पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना यातील एक आरोपी हा पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळाल्याची घटना बुधवारी घडली.
नर्सी पोलीस ठाणे हद्दीतील पुसेगाव या ठिकाणी गावातील जागेचा हिस्सा का मागतो या कारणावरून दोन गटांमध्ये कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी केल्याची घटना घडली होती. यावरून आरोपी प्रवीण सुभाष देशमुख,लक्ष्मण सुभाष देशमुख,व सुभाष साहेबराव देशमुख,यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांना नर्सी पोलीसांकडून ठाण्यात अटक करण्यात आली होती.
ता.९ रोजी सायंकाळच्या गुन्ह्याच्या तपास कामासाठी आरोपींचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यासमोरील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले याठिकाणी रक्ताचे नमुने घेतल्यानंतर आरोपींना पोलीसांच्या रखवालीमध्ये ठाण्यात नेत असताना यातील एका आरोपीने पोलिसाच्या हाताला अचानक झटका देऊन फरार झाला आहे. सदरील फरार झालेला आरोपी प्रवीण सुभाषराव देशमुख याचे विरुद्ध फिर्यादी पोउपनि रामराव पोटे यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपीची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.