पुरात निभाव लागला नाही; दुचाकी वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 07:27 PM2023-07-27T19:27:18+5:302023-07-27T19:27:49+5:30

असं धाडस करू नका! ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकी वाहून गेली 

The flood did not stop; The bike was swept away, the driver narrowly escaped | पुरात निभाव लागला नाही; दुचाकी वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला

पुरात निभाव लागला नाही; दुचाकी वाहून गेली, चालक थोडक्यात बचावला

googlenewsNext

- रमेश कदम
आखाडा बाळापूर (हिंगोली):
कामठा फाटा ते गोटेवाडी रस्त्यावरील येलकी गावाजवळ असलेल्या ओड्याला पूर आल्याने तेथील संपर्क तुटला आहे. दरम्यान, पुरातून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला असता एकाची दुचाकी वाहून गेली, चालक थोडक्यात बचावल्याची घटना आज दुपारी घडली.

बाळापुर परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे.आज पावसाचा जोर वाढलामुळे नदी ,नाले ओड्यांना पूर आला आहे .शिवारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे .शेवाळा शिवारात नाल्याचा बांध फुटून शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. कवडी शिवारातही सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कामठा फाटा ते गोटेवाडी , कसबे धावडा, येलकी या गावांना जाणारा रस्त्यावर येलकि ते मंचक नगर येथे रस्त्यावर असलेल्या ओड्याला पूर आला. 

पुलावरून पाणी वाहत होते. यावेळी एकाने पुराच्या पाण्यातून दुचाकी घालत रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाह वेगवाग असल्याने दुचाकी वाहून गेली. तर चालक थोडक्यात बचावला. मंचक नगर येथील तरुणांनी चालकाला बाजूला केले. पूर ओसरळल्यानंतर दुचाकीही शोधून काढली. या ओढ्यावरील पुरामध्ये यापूर्वी एका तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आज तरुणांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुचाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Web Title: The flood did not stop; The bike was swept away, the driver narrowly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.