परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:31 PM2022-10-07T18:31:19+5:302022-10-07T18:31:19+5:30

ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली

the havoc of the return rains; 6 villages were cut off due to water flowing over the bridge | परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला

परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला

Next

औंढा नागनाथ (हिंगोली): परिसरात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने नदीनाले तुडूंब भरून वाहत आहेत. ६ ऑक्टोबर रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे आज दरेगाव ते औंढा रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले होते.

परतीच्या पावसाचा कहर पहावयास मिळत आहे. सातत्याने मुसळधार पाऊस पडत असलेल्याने पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी रात्री सुरु झालेला पाऊस आज पहाटे देखील सुरु होता. मुसळधार पावसाने दरेगाव औंढा मार्गावरील ओढ्याला पूर आला आहे. आनंदाश्रमजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे लोहरा, दरेगाव, संघ नाईक तांडा, लक्ष्मण नाईक तांडा सावरखेडा यासह सहा गावचा संपर्क तुटला होता.
 

Web Title: the havoc of the return rains; 6 villages were cut off due to water flowing over the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.