'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

By विजय पाटील | Published: October 21, 2023 05:30 PM2023-10-21T17:30:33+5:302023-10-21T17:32:03+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी

'The leader went to the stove and his party went to the stove'; Entry ban for leaders in Salapur | 'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

हिंगोली : 'चुलीत गेला नेता चुलीत गेला त्याचा पक्ष' जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना सालापूर गावात प्रवेश बंदी अशा प्रकारचा फलक ग्रामस्थांनी लावलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरीत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही‌. तोपर्यंत मतदानावर बहिष्कार राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी आदी प्रकारचे निर्णय ग्रामस्थांच्या वतीने विविध ठिकाणी घेतल्या जात आहेत. अशाच प्रकारचा निर्णय कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. येथील ग्रामस्थांनी  गावाच्या प्रवेशद्वारावर मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही.तोपर्यंत सर्व  राजकीय नेत्यांना सालापूर गावात प्रवेश बंदी असा फलक लावला आहे.

'चुलीत गेला नेता नेता चुलीत गेला त्याचा पक्ष,मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष' असा स्पष्ट उल्लेख स्पष्ट उल्लेख त्या फलकावर गावकऱ्यांनी केला आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे राजकीय पक्षाचे बॅनर गावात लावू नये आणि आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा असा इशारा या फलकाद्वारे गावकऱ्यांनी पूढार्‍यांना दिला आहे. त्यानुसार आता जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत यापुढे याहीपेक्षा कठोर निर्णय विविध ठिकाणचे ग्रामस्थ घेतील असेच यावरून दिसून येत आहे.

Web Title: 'The leader went to the stove and his party went to the stove'; Entry ban for leaders in Salapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.