वसमतच्या मोंढ्यात हळदीस सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला
By विजय पाटील | Published: August 4, 2023 07:12 PM2023-08-04T19:12:19+5:302023-08-04T19:12:30+5:30
आज आवक मोठ्या प्रमाणात झाली, दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला.
- इस्माईल जाहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): येथील कृऊबा बाजार समिती मोंढ्यात शुक्रवारी ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात ११ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही बिटात हळद २३ हजार रुपयांवर हळद गेली होती. हळदीचे दर ५ दिवसांपासूर स्थिर होते. शुक्रवारी झालेल्या बिटात सर्वाधिक ३० हजार व त्यानंतर २५ हजारांचा दर हळदीस मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे.
वसमतच्या मोंढ्यात ४ ऑगस्ट रोजी हळदीच्या ८ हजार कट्यांची आवक आली होती. शुक्रवारी हळदीचे बोली बिट झाले बिटात हळदीस ११ हजार ते १६ हजार रुपयांचा दर मिळाला. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले (रा दिग्रस) यांच्या दर्जेदार हळदीच्या ६ कट्ट्याला ३० हजार तर शेतकरी मारोतराव पवार (रा. रेडगाव) यांच्या ५१ कट्ट्याच्या लॉटला २५ हजार दर मिळाला. गत पाच दिवसांपासून हळदीचे दर स्थिर होते.
शुक्रवारी आवक मोठ्या प्रमाणात झाली. दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला. यापेक्षाही जास्त दर हळदीस यावर्षी मिळेल, अशी अशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मोंढ्यात साधारण हळदीस १५ ते १६ हजारांचा दर मिळतो तर दर्जेदार हळदीचे दर उच्चांकी दर गाठत आहेत.
दर्जेदार हळदीच्या दरात उच्चांकी....
४ ऑगस्ट रोजी कृऊबा समीती मोंढ्यातील बिटात सर्वाधिक ३० हजार व २५ हजार दर्जेदार हळदीस दर मिळाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करताना खात्री करावी.
-तानाजी बेंडे, सभापती कृऊबा वसमत
दर्जेदार हळदीच्या दरवाढीची शक्यता ...
दर्जेदार हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या बोली बिटात ६ कट्ट्याच्या लॉटला ३० हजार तर ५१ कट्ट्यांच्या लॉटला २५ हजार दर मिळाला. दर्जेदार हळीचे दर यापुढेही वाढतील, अशी अशा आहे. साधारणत:हळदीचे दर ११ ते १६ हजारा पर्यंत होत आहे.
- दौलत हुंबाड, अध्यक्ष व्यापारी संघ वसमत
समाधानकारक दर मिळाला...
कृऊबा समीती मोंढ्यात दर्जेदार हळदीचे ६ कट्टे बिटात टाकले होते. हळद दर्जेदार होती. त्या प्रमाणात ३० हजार रुपयांचा समाधान कारक दरही मिळाला. हळदीस येवढा दर मिळेल अशा नव्हती.
-शेषेराव बोंबले, शेतकरी,रा. दिग्रस, जि. परभणी