चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार विद्युत खांबास धडकून शेतात उलटली; तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:33 PM2024-10-09T16:33:05+5:302024-10-09T16:34:14+5:30
गुंडा पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरगाव वेगाने जाणारी कार विद्युत खांबाला धडकून शेतात जावून उलटली.
- अरुण चव्हाण
जवळाबाजार (जि. हिंगोली): जवळाबाजार ते झिरोफाटा रस्त्यावरील गुंडापाटीजवळ बुधवारी चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. या दरम्यान ही कार बाजूच्या शेतात जावून उलटली असून या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी २ वाजेदरम्यान घडला.
९ ऑक्टोबर रोजी औंढा तालुक्यातील जवळा बाजार ते परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा रस्त्यावरील गुंडा पाटीजवळ एक कार भरधाव वेगाने जात होती. या कारमध्ये तीन व्यक्ती बसलेले होते. कारचा वेग वाजवीपेक्षा अधिक असल्यामुळे चालकाचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटले. याचदरम्यान कार क्षणातच बाजूला असलेल्या विद्युत पोलला धडकून शेतात जावून उलटली. या अपघातात कार (क्र. एमएच २२ यू ४७१२) मधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. उपस्थित नागरिकांनी हा अपघात पाहताच गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी परभणीला पाठविले आहे.