भरधाव कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये शिरली; चिरडून आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:33 PM2023-07-05T12:33:46+5:302023-07-05T12:34:25+5:30

रस्त्यालगतच्या शेडमध्ये आजोबा आणि नातू झोपले होते

The speedy car hits roadside shed; Grandfather crushed to death on the spot, grandson seriously injured in Sengaon | भरधाव कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये शिरली; चिरडून आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी

भरधाव कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये शिरली; चिरडून आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी

googlenewsNext

सेनगाव: शहरानजीक सेनगाव-रिसोड रस्त्यावर भरधाव कार रस्त्यालगतच्या एका शेडमध्ये शिरून भीषण अपघात झाला. यात शेडमध्ये झोपलेल्या एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज पहाटे असून पोलिसांनी कारमधील चौघांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोलीकडे एक कार (क्रमांक एम एच 16-एटी 6710 ) भरधाव वेगाने जात होती. सेनगावजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये घुसली. यावेळी शेडमध्ये झोपलेले नामदेव हागे यांचा कारखाली चिरडून यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा नातू गोपाल हा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून गोपाल यास उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: The speedy car hits roadside shed; Grandfather crushed to death on the spot, grandson seriously injured in Sengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.