एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष

By रमेश वाबळे | Published: November 26, 2023 03:31 PM2023-11-26T15:31:35+5:302023-11-26T15:32:23+5:30

हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींचा एल्गार महामेळावा

The traditional costumes of the OBC brothers attracted attention in the Elgar Maha Mela | एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष

एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष

हिंगोली: शहरातील रामलीला मैदानावर आज घेण्यात येत असलेल्या ओबीसी समाजाच्या मराठवाडास्तरीय दुसऱ्या एल्गार महामेळाव्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातून समाजबांधव सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात पारंपरिक अनेक समाजबांधव परंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदविला आहे. या ठिकाणी समाजबांधवांनी हलगी वाजवित उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी हलगीच्या तालावर अनेकांनी ठेकाही धरला होता. 

ओबीसी समाजाच्या एल्गार महामेळाव्याची तयारी मागील आठवड्यापासून सुरू होती. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास मेळावास्थळी शहरांसह ग्रामीण भागातून समाजबांधव दाखल होत होते. तर दुपारी १२ च्या सुमारास मैदानावर सर्वत्र गर्दी दिसून येत होती. यादरम्यान अनेक समाजबांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत महामेळावास्थळ गाठले होते. बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा धारण करत सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर भटक्या विमुक्त समाजातील बांधवांनीही आपापल्या पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली.

Web Title: The traditional costumes of the OBC brothers attracted attention in the Elgar Maha Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.