साहित्य चोरीची चौकशी होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:54 PM2018-12-28T23:54:49+5:302018-12-28T23:55:04+5:30
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील साहित्य हे लिलाव न करताच ५ डिसेंबर रोजी सायंकाळी टेम्पोत भरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबतची तक्रार १५ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप शाळेतील साहित्य चोरीची चौकशी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील साहित्य हे लिलाव न करताच ५ डिसेंबर रोजी सायंकाळी टेम्पोत भरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबतची तक्रार १५ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप शाळेतील साहित्य चोरीची चौकशी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत २५ डिसेंबर रोजी संबधित शिक्षण विस्तार अधिकाºयांशी दुरध्वनीवरून संपर्क केला असता ते म्हणाले की, अजूनही चौकशी करण्याचे आदेश आले नाहीत. आदेश आल्यानंतर चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले. तर केंद्र प्रमुख घुमनर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, चौकशीचे आदेश आले आहेत. परंतु इतर कामे असल्यामुळे २९ डिसेंबर रोजी चौकशी करण्यासाठी येणार आहे. असे त्यांनी सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या दोघांचा ताळमेळ नसल्याने चौकशी झालीच नाही. शाळेतील मुख्याध्यापकाच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमीच चोºया होतात. या प्रकरणी योग्य चौकशी करून दोषींविरूद्ध कडक कार्यवाही करावी, अशी मागणी गावकºयांच्या वतीने करण्यात येत आहे.
१६९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी २७ डिसेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १६९ वाहन चालकांकडून पोलिसांनी ५९ हजार रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दीळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध दरदिवशी कारवाई केली जाते.