मुंबईत केलेल्या चोरीचा माल हिंगोलीत विकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:40 AM2018-11-24T00:40:03+5:302018-11-24T00:40:18+5:30
मुंबई येथील घरफोडी व चोरी प्रकरणातील आरोपीने हिंगोलीत दागिने विकल्याच्या तपासासाठी मुंबईचे पथक हिंगोली येथे २३ नोव्हेंबर रोजी दाखल झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुंबई येथील घरफोडी व चोरी प्रकरणातील आरोपीने हिंगोलीत दागिने विकल्याच्या तपासासाठी मुंबईचे पथक हिंगोली येथे २३ नोव्हेंबर रोजी दाखल झाले होते.
आरोपीचे नाव संतोष त्र्यंबक घनघाव असून तो सेनगाव तालुक्यातील पार्डी पो. येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथे कामानिमित्त राहत होता. त्याने मुंबईत घरफोडी करून लंपास केलेले दागिने हिंगोलीत आणून विकले. याप्रकरणी मुंबई पोलिसांत दाखल गुन्ह्यात त्याला पकडले. अधिक चौकशीसाठी हिंगोली येथे आणले होते. पथकामध्ये नवी मुंबईचे पीएसआय कुंभार व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. घरफोडी व सराफा दुकानात चोरी केलेला ऐवज त्याने हिंगोली येथे विक्री केला होता. त्यामुळे पथकाने हिंगोली शहरातील काही सराफा व्यापाºयांचीही चौकशी केली.
त्यामुळे सराफा व्यापाºयांत खळबळ उडाली होती. संतोष घनघाव याची सासूरवाडी सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथेही पोलिसांनी जाऊन अधिक चौकशी केली. शुक्रवारी दिवसभर पोलीस पथक तपासासाठी हिंगोलीत तळ ठोकून होते.