...तर पथकाला शस्त्रधारी पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:23 AM2018-11-20T00:23:22+5:302018-11-20T00:23:35+5:30
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे, यासाठी जिल्हा पातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे, यासाठी जिल्हा पातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. पण महसूलच्या आशा पथकांवर जीवघेणे हल्ले झाल्याने आशा पथकाला आता सशस्त्र पोलिसांचे संरक्षण मिळणार आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना आदेश दिला असून मागणी होताच तात्काळ सशस्त्र पोलीस पुरविण्यास बजावले आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. यासाठी पथकेही तैनात केली.या दरम्यान महसूल कर्मचाºयांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमलेल्या पथकासमवेत दोन सशस्त्र पोलिसांची नियुक्ती केली असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविले आहे. त्या पत्राच्या संदर्भान्वये जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांनी आदेशित केले आहे.
या आदेशानुसार महसूल कर्मचाºयांच्या पथकाने मागणी करताच दोन सशस्त्र पोलीस ठाणे हद्दीत पुरवावेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता गौण खनिज चोरीवर नियंत्रण ठेवणाºया पथकाला सशस्त्र पोलिसांचे सरक्षण मिळणार आहे.