हिंगोली जिल्ह्यात ५६ शिक्षक रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:20 AM2018-05-15T00:20:35+5:302018-05-15T00:20:35+5:30
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
यंदा आंतरजिल्हा बदल्यांच्या आॅनलाईन प्रक्रियेचा शिक्षकांना चांगला लाभ झाला. जिल्ह्यातून १0७ शिक्षकांना बाहेर जाण्याची संधी आहे. त्यापैकी लातूर जिल्ह्यात जाणाºया २४ शिक्षकांना शासन आदेशानुसार कार्यमुक्त केले नाही. उर्वरित ८३ पैकी ८१ जण कार्यमुक्त झाले. तर जिल्ह्यात येणाºया ९६ जणांपैकी ५६ जणांना शिक्षण विभागात रुजू केले. उर्वरित अजून आलेच नाहीत. आलेल्यांना तालुका व शाळा बहाल केली नाही.
माध्यमिकच्या हालचाली
जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन नाही. अपुरी संख्या असल्याने आॅफलाईन प्रक्रिया होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती मागविण्याचे काम सुरू आहे.
जि.प.तील इतर बदल्यांची चर्चा
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जि.प.तील इतर पदांच्या बदल्यांचे वेळापत्रक येऊनही प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे शासनाकडून या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून त्यानंतरच ३१ मेपूर्वी इतर संवर्गातील बदल्याही होतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी बदल्यांसाठी पात्र ठरणाºयांपैकी अनेकांना जागचे हलायचे नसल्याने ते नकार देऊन मोकळे होतात.