मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:23 AM2018-01-23T00:23:33+5:302018-01-23T00:23:39+5:30
येत्या चोवीस तासांत मराठवाड्याला थंडीच्या लाटेचा फटका सोसावा लागण्याची भीती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येत्या चोवीस तासांत मराठवाड्याला थंडीच्या लाटेचा फटका सोसावा लागण्याची भीती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी चांगलाच गारठा जाणवत होता. तापमान १२ अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्यात रात्रीच्या वेळी प्रवास करणे तर अवघडच होवून बसले होते. इतकी थंडी वाढली होती. मध्यंतरी ही लाट ओसरली होती. त्यानंतर मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याचे जाणवत आहे. आता हवामान खात्याने पुन्हा इशारा देत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर झोपू नये. उबदार कपडे घेवूनच बाहेर पडावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण यांनी केले आहे.