‘इसापूर’ची सात आवर्तने मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:06 AM2018-10-23T00:06:07+5:302018-10-23T00:06:27+5:30
परिसरात रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची पातळी आतापासूनच खालावल्याने शेतकरी चिंतेत होते. मुंबई येथे नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात इसापूर धरणाच्या उजवा कालव्यासाठी सात पाणीपाळ्या देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये रबीसाठी ३ तर उन्हाळी करिता ४ आवर्तने दिले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदा : परिसरात रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची पातळी आतापासूनच खालावल्याने शेतकरी चिंतेत होते. मुंबई येथे नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात इसापूर धरणाच्या उजवा कालव्यासाठी सात पाणीपाळ्या देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये रबीसाठी ३ तर उन्हाळी करिता ४ आवर्तने दिले जाणार आहेत.
कुरुंदा हा भाग सिंचनाखाली येतो. इसापूर धरणाच्या पाण्यावर रबी हंगाम व बागायती पिके अवलंबून असतात. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लक्ष इसापूर धरणाच्या पाणीपाळ्यांकडे लागलेले होते. या भागात आतापासूनच पाण्याची पातळी खालावली असून दुष्काळी अवस्था निर्माण झाली. तर विहिरी व तलाव तळ गाठू लागले आहेत. त्यात रबी हंगाम धोक्यात आल्यात जमा होता. या भागामध्ये पाणीपातळी घसरलेली असली तरीही हळदीचे उत्पादन ठिबकच्या साह्याने वाचविल्या जाते. शेतकरी रबी पेरणीच्या विवंचणेत होते. इसापूर धरणाच्या पाणीपाळ्याकडे जाहीर होण्याकडे कुरुंदा भागातील शेतकºयांचे लक्ष लागलेले होते .
मुंबई येथे १६ आॅक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा विभागाने घेतली. त्यात इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याकरिता पाणीपाळीची आवर्तणे निश्चित करण्यात आली. त्यामुळे भाटेगाव कालव्याला सात पाणीपाळ्या मिळणार आहेत. तीन हिवाळी तर चार उन्हाळी आवर्तने दिली जातील. येत्या पाच नोव्हेंबर रोजी पहिली पाणीपाळी या भागात दिली जाणार आहे. सात पाणीपाळया निश्चित करण्यात आल्याने रब्बी पेरणीला इसापूर धरणाचे पाणी फायदेशीर ठेरणार आहे. पहिल्या आवर्तनानंतर या भागात रबी पेरणीला गती मिळणार आहे .