दानपेट्या पळविणारे चोरटे जेरबंद ; पाच गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:33 AM2021-08-28T04:33:01+5:302021-08-28T04:33:01+5:30
जिल्ह्यातील विविध मंदिरातील दानपेट्या लक्ष करीत त्यातील पैसे पळविण्याचा फंडा चोरट्यांनी सुरू केला होता. सेनगाव, गोरेगाव, हिंगोली ग्रामीण ...
जिल्ह्यातील विविध मंदिरातील दानपेट्या लक्ष करीत त्यातील पैसे पळविण्याचा फंडा चोरट्यांनी सुरू केला होता. सेनगाव, गोरेगाव, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंदिरात चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता. यावेळी सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील दोघांनी दानपेटी फोडल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यावरून आदिनाथ शिवाजी हानवते, कृष्णा सूर्यभान जुमडे (दोघे रा. आडोळ ता. सेनगाव) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी खैरी घुमट येथील कानिफनाथ मंदिर, कवठा शिवारातील जगदंबा मंदिर, इडोळी येथील जागृत महादेव मंदिर, नांदुरा येथील देवीचे मंदिर, नागमाथा येथील नागमाया देवीचे मंदिरातील दानपेटी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून पाच गुन्ह्यातील ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांना पुढील तपासासाठी सेनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवासांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, सपोउपनि बालाजी बोके, पोना संभाजी लेकूळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, नितीन गोरे, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने केली.
फोटो :